Sanjay gandhi yojana benefits नमस्कार मित्रांनो आज मंत्रिमंडळ निर्णय भरपूर असे घेण्यात आलेले आहेत त्यामधला हा एक मंत्रिमंडळ निर्णय, ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना आता मानधनात वाढ होणार आणि त्या संदर्भातला हा एक निर्णय नक्की काय आहे. तो आज आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Sanjay gandhi yojana benefits संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत दरमहा जवळ जवळ पाचशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. आणि हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे म्हणून बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे होते. त्यांनी हा पाचशे रुपयाचा या योजनेमध्ये वाढ केलेली आहे.
सिबील स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करून
Sanjay gandhi yojana benefits तसेच या दोन्ही योजनेमध्ये सध्या प्रत्येक नागरिकाला एक हजार रुपये मानधन मिळत होते आणि आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने आता दीड हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे. यामध्ये कोणाला लाभ मिळणार आहे, एक अपत्य असलेल्या किंवा विधवा लाभार्थ्यांना सध्या एक हजार शंभर रुपये तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना एक हजार दोनशे इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते.
आपल्या कुटुंबातील वारसाची जमीन अशी करा नावावर त्यासाठी कोठे करणार अर्ज सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
यात अनुक्रमे चारशे रुपये व तीनशे रुपये अशी वाढ देखील करण्यात आलेली आहे सध्या या दोन्ही योजनात मिळून चाळीस लाख 99 हजार 240 लाभार्थी आहेत, तसेच निवृत्ती वेतनात वाढ झाल्यामुळे 2400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. संजय गांधी व श्रावण बाळ निवृत्ती वेतन लाभार्थ्यांना आता एक हजार ऐवजी दीड हजार रुपये प्रति महिना प्रति लाभार्थी मिळणार आहेत. यासाठी 2459 कोटींचा भार आता राज्य सरकार घेणार आहे यामध्ये जवळपास सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.