Satatcha paus anudan या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सततच्या पावसाचे हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान वितरण सुरू.

Satatcha paus anudan नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सततच्या पावसाचे अनुदान आज पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडण्यास सुरुवात, सन 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सततच्या पावसाचे आणि आपत्ती नुकसान भरपाई घोषित करून त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

 

तसेच राज्यातील 14 जिल्ह्यातील 20 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्या निधीच्या वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.याच्याच अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्यांची केवायसी करून त्या शेतकऱ्यांच्या अनुदान देखील वितरित करण्यात आला आहे तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी झालेली होती परंतु त्या शेतकऱ्यांचे अनुदानाचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं म्हणून ते शेतकरी बऱ्याच दिवसापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते.

Satatcha paus anudan अशाच या जवळपास तीन लाख शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप देखील वितरित झालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाची वितरणाची प्रक्रिया ही 28 ऑगस्ट 2023 रोजी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तसेच हे अनुदानच्या माध्यमातून वितरण करण्यात येत आहे तसेच आजपासून आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे तसेच या तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास दोनशे दहा कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेत झाला मोठा बदल आता मिळणार प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे पहा अधिक माहिती येथे क्लिक करून

तसेच या 14 जिल्ह्यातील 26 लाख 50 हजार शेतकरी पात्र करण्यात आले आहेत, तसेच या शेतकऱ्यांचे टप्प्याटप्प्याने केवायसी करून अनुदान वितरित केल जाणार आहे,हे जिल्हे खालील प्रमाणे आहेत, अहमदनगर,अकोला अमरावती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर वाशिम अशा 14 जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत.

Leave a Comment