Soybean market today price नमस्कार मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि सोयाबीनचे बाजार भाव चांगले राहिले तर शेतकरी अडचणी पासून दूर राहू शकतो, गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही.तसेच सर्वच बाजारात सध्या नवीन सोयाबीनची आवक वाढली आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी बाजार समितीत गेल्या चार दिवसांत २२ हजार ५८१ एवढी क्विंटल आवक झाली आहे.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेची भावपातळी वाढली. ब्राझीलमध्ये काही भागात पिकाला पोषक स्थिती नाही. यामुळे ही भाववाढ झाल्याचे अभ्यासक सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात एका महिन्यात सोयापेंडेचे भाव २० टक्क्यांनी वाढले. यामुळे भारताकडे मागणी वाढली. परिणामी सोयाबीनची भावपातळी २०० ते ३०० रुपयांनी वाढल्याचेही जाणकारांनी सांगितले.
सोयाबीनच्या भाववाढीला तसे तीन बाजारातील पायाभूत घटक कारणीभूत आहेत. पण तिन्हींच्या मुळाशी एक कारण आहे. ते म्हणजे ब्राझील. ब्राझील हा जगातील महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक देश. यंदा ब्राझीलमध्ये आतापर्यंतचे विक्रमी सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव होता. त्याचा परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावरही दिसून येत होता. त्यामुळे आपला भाव ४ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार करत नव्हता. म्हणजेच भाव दबावात राहण्यामागही ब्राझील काही प्रमाणात कारणीभूत होता.
पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्याची तारीख आली पहा कधी मिळणार येथे क्लिक करून
Soybean market today price आता ब्राझीलमधील काही सोयाबीन उत्पादक भागात पाऊस नाही. पिकाला पोषक वातावरण नाही. यामुळे ब्राझीलमधील उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील, असे अंदाज आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव वाढला. यामुळे अमेरिकेच्या बाजारात भाव वाढले. सोयापेंडेचे भाव महिनाभरातच जवळपास २० टक्क्यांनी वाढले.सोयाबीनही १० टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडेचा भाव ३७१ डॉलर प्रतिटनांवरून ४५१ डॉलर प्रतिटनांवर पोचला. आजही अमेरिकेच्या सोयापेंडेचे भाव भारताच्या सोयापेंडपेक्षा कमीच आहेत.
पण आशियातील देशांना सध्याच्या भावात अमेरिकेपेक्षा भारताकडून सोयापेंड घेणे परवडते. त्यामुळे आपल्या शेजारचे आणि आशियातील देश भारताकडून सोयापेंड घेत आहेत. सोयापेंड बंदरावर जवळपास ४६ हजार रुपये प्रतिटनाने मिळत आहे, असे काही निर्यातदारांनी सांगितले.
जमिनीचा गट नंबर टाकून पाहू शकता जमिनीचा नकाशा येथे क्लिक करून
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचा भाव आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय सोयापेंडेलाही मागणी वाढेल. सोयापेंड निर्यातीचे सौदे पूर्ण करण्यासाठी गाळपासाठी प्रक्रिया प्लांट्सना सोयाबीन खरेदी वाढवावी लागेल.यंदा उत्पादनात घट आहे. त्यामुळे भावात सुधारणा होऊ शकते. सोयाबीनचा भाव पुढील दोन महिन्यांमध्ये ५ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.