Soyabean today new price नमस्कार मित्रांनो यंदा राज्यामध्ये बऱ्याच दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटले आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि सोयाबीनचे बाजार भाव चांगले राहिले तर शेतकरी अडचणी पासून दूर राहू शकतो, गेल्यावर्षी सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे सध्या सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन काढण्यात येते, सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीवर आलेले आहे तर बाजार समितीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या आवके मध्ये भर पडलेली आहे. तसेच विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9 ऑक्टोंबर रोजी ची सोयाबीन आवक 814 क्विंटल होती, परंतु सोयाबीनला 3700 रुपये पासून ते 4470 रुपये एवढा दर मिळाला.
ऑक्टोंबर महिन्यामध्ये पूर्वी सोयाबीन ओवकेमध्ये घट झालेली होती, परंतु आता मात्र ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनच्या दरामध्ये काही प्रमाणात तेजी पाहायला मिळाली. पुढील काळात सोयाबीनचे भाव वाढतील असा अंदाज जाणकार लोक सांगतात,पण तेव्हा नवीन सोयाबीनला जास्तीत जास्त 4475 रुपये एवढा दर मिळाला.सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये 9 ऑक्टोंबर ला थोड्या प्रमाणात घट बघायला मिळाली, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बहुतशी सोयाबीन काढणीला आलेले आहे.
आजचे नविन खतांचे भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर अनेकांचे सोयाबीन हे बाजारामध्ये विक्री करीता आणले जात आहे परंतु अशा स्थितीमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झालेली सोमवारला दिसत आहे.9 ऑक्टोंबर ला सोमवार रोजी 814 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली होती, आवकें मध्ये घट होऊन सुद्धा नऊ तारखेला सोयाबीनच्या दरात घसरण झालेली दिसते, व सोयाबीनला मिळालेला सरासरी दर 4200 एवढा होता तर जास्तीत जास्त दर चार हजार 4700 रुपये एवढा दर मिळाला , कमीत कमी 3700 रुपये एवढा दर मिळाला, अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी, म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्याची घाई करू नये पुढील काळात सोयाबीनचे भाव सुधारतील असे जाणकार लोक सांगतात.read more
देशात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोन राज्य सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहेत. सध्या या दोन्ही राज्यांसोबतच राजस्थानध्येही सोयाबीनची आवक वाढत आहे. पण सोयाबीनची भावपातळी सुरुवातीपासूनच हमीभावापेक्षा कमी राहीली आहे. सोयाबीनला यंदा सरकारने ४ हजार ६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला. मागील तीन ते चार दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा झाली आहे.
आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युध्दामुळे पुन्हा एकदा जागितक पातळीवर तणाव निर्माण झाला. काही अरब देश ईस्त्राईलच्या विरोधात भुमिका घेताना दिसतात. या देशांनी कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्याची धमकी दिली. यामुळे जागतिक पातळीवर कच्या तेलाचे भाव वाढले आहेत. तेलाचे भाव वाढल्यानंतर अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये बायोडिझेलमध्ये सोयातेलाचा वापर वाढतो. याचा आधार सोयाबीनला मिळत आहे.
देशातील बाजारातही सोयाबनचे भाव मागील आठवडाभरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयाने वाढले आहेत. देशात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. भाव कमी असल्याने काही ठिकाणी सोयाबीनची हमीभावाने खेरदी करण्याची मागणी होत आहे. पण यंदा सोयाबीनला हमीभाव मिळाला तरी शेतकऱ्यांना परवडणारे नाही. एकतर यंदा उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन किमान ३० ते ४० टक्क्यांनी घटले. त्यामुळे क्विंटलचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तर उत्पादन खर्च भरून निघेल.