Weather forecast update राज्यात जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि फक्त या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस.

Weather forecast update नमस्कार शेतकरी मित्रहो राज्यात दोन-तीन दिवसापासून बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते हलक्या पावसाची नोंद झालेली आहे तरी राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २५) राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उद्या (ता. २६) उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

तसेच नैर्ऋत्य अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे वरील चक्राकार वाऱ्यांपासून महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे उद्या (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

म्हणून पुढील काही दिवस राज्यात ढगाळ हवामान झाले असून, आज (ता.२५) कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उद्या (ता. २६) नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

उर्वरित राज्यात कमाल तापमान ३१ ते ३४ अंशाच्या दरम्यान होते. किमान तापमानातही काहीशी वाढ झाली असून, बहुतांश ठिकाणी तापमान १७ ते २० अंशांदरम्यान आहे. शुक्रवारी (ता. २४) निफाड येथील गहु संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव.विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

Leave a Comment