Gold price today नवीन वर्षात सोन्याचे भाव उच्चांक दरावर पहा आजचे 24 कॅरेट सोन्याचे बाजार भाव.

Gold price today नमस्कार मित्रांनो सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी वाईट बातमी कारण नवीन वर्षात सोन्याची भाव वाढले पहा वर्षाच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ दिसून आली. सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमती वाढीसह व्यवहार करत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजारातील संमिश्र व्यवहारानंतर मंगळवार, २ जानेवारी २०२४ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ नोंदवली गेली.

मंगळवारीही सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली असून सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकाच्या जवळ उसळला आहे. अमेरिकेत व्याजदरात कपात होण्याची शक्यता देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतीमागील कारण आहे.यूएसमधील महागल्या व्याज दरांमुळे २०२० नंतर प्रथमच परदेशी बाजारात सोन्याचा भाव २००० डॉलरच्या वर पोहोचला ज्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला असताना नवीन वर्षातही सोन्याच्या किमतीत दरवाढीचे सत्र सुरूच आहे. तर आजही सोन्याचा दर आणखी महागला आहे.

मोदी आवास योजनेअंतर्गत या घटकातील लाभार्थ्यांना मिळणार घरकुले पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करून

सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायमदेशांतर्गत सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी राहिली. MCX वर सोन्याच्या किमतीत १०० रुपयांनी वाढ झाली आणि १० ग्रॅम सोन्याचा दर ६३,४२३ रुपयांवर पोहोचला. लक्षात घ्या की गेल्या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याने ६४,०६३ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक नोंदवला होता. तर सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही वाढ झाली असून एमसीएक्सवर चांदी २२५ रुपयांनी वाढून ७४,६१५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी

Gold price today याशिवाय जागतिक स्तरावर सोन्याच्या स्पॉट आणि फ्युचर्स किमतीतही वाढ झाल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती वाढत असून कॉमेक्सवर, सोन्याची किंमत सुमारे ७ डॉलर वाढीसह २,०८० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीनेही उसळी घेतली आणि प्रति औंस २४.१७ डॉलरवर पोहोचली. नवीन वर्ष २०२४ मध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी चांगले संकेत आहेत. फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते.

Leave a Comment