Soybean Market आजच्या सोयबिन बाजार भावात मोठी वाढ,पहा संपुर्ण बाजार समितीचे आजचे भाव.

Soybean Market नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने खाद्य तेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलबिया त्यासोबतच कच्चा तेलाच्या आयातीवर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देशांतर्गंत बाजारपेठेत तेलबियावर्गीय पिकांचे दर दबावात आले आहेत.त्याचा फटका सोयाबीन उत्पादकांनाही बसत असल्याचे चित्र आहे. सध्या देशांतर्गंत बाजारपेठेत सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपेक्षा खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यामुळेच बाजारात माल कमी आणण्यावर भर दिला जाता होता. अमरावती बाजार समितीमधील आवक गेल्या काही दिवसांपासून अवघ्या चार हजार क्‍विंटलवर स्थिरावली होती.परंतु यापुढील काळात देखील सोयाबीन दरात तेजीचे कोणतेही संकेत मिळत नसल्याने अखेरीस सोयाबीन विक्रीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्याच कारणामुळे बाजारातील आवक पूर्वीच्या चार हजार क्विंटलवरून सरासरी तीन हजार क्‍विंटलने वाढून साडेसात हजार क्‍विंटलवर पोहोचली आहे.

कमीतकमी ४५००, तर जास्तीत जास्त ४६५१ रुपयांचा दर सोयाबीनला मिळत आहे. दुसरीकडे बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये ओलावा आणि कचरा निर्धारीत प्रमाणापेक्षा अधिक असल्यामुळेच दर कमी असल्याचा दावा व्यापारी करीत आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी मात्र नाइलाजाने सोयाबीन विक्रीवर भर देत असल्याचे चित्र आहे.

आजचे संपूर्ण बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव खालील प्रमाणे आहेत.

लातूर जिल्हा सोयबीन भाव

लातूर जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

शिरूर ताजबंद – 4725 प्रति क्विंटल

शिरूर अनंतपाळ – 4730प्रति क्विंटल

निलंगा – 4725 प्रति क्विंटल

लोहारा- 4720 प्रति क्विंटल

वलांडी – 4715 प्रति क्विंटल

रेणापूर – 4755 प्रति क्विंटल

आष्टामोड – 4740 प्रति क्विंटल

निटुर – 4730 प्रति क्विंटल

परभणी जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

पुर्णा – 4660

पालम – 4680

मानवत – 4670

ब्राम्हणगाव (परभणी) – 4690

सोलापूर जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Solapur

सोलापूर जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

गौडगाव – 4710 प्रति क्विंटल

बीड जिल्हा जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Beed

बीड जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

अंबाजोगाई – 4725 प्रति क्विंटल

बर्दापुर – 4735 प्रति क्विंटल

केज – 4715 प्रति क्विंटल

बनसारोळा – 4720 प्रति क्विंटल

नेकनुर – 4705 प्रति क्विंटल

घाटनांदूर- 4735 प्रति क्विंटल

पाटोदा – 4680 प्रति क्विंटल

तेलगाव – 4700 प्रति क्विंटल

 

धाराशिव जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

येडशी – 4720 प्रति क्विंटल

घोगरेवाडी – 4730 प्रति क्विंटल

वाशी – 4700 प्रति क्विंटल

धाराशिव – 4720 प्रति क्विंटल

ईट – 4700 प्रति क्विंटल

तुळजापूर – 4720 प्रति क्विंटल

नांदेड जिल्हा जिल्हा जिल्हा सोयबीन भाव soybean rate today Nanded

नांदेड जिल्ह्यातील सोयबीन भाव खालील प्रमाणे आहेत

अर्धापूर (खडकुत)- 4670 प्रति क्विंटल

नायगाव – 4650 प्रति क्विंटल

जांब – 4715 प्रति क्विंटल

सोनखेड – 4680 प्रति क्विंटल

देगलूर – 4690 प्रति क्विंटल

देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडेची भावपातळी वाढली. ब्राझीलमध्ये काही भागात पिकाला पोषक स्थिती नाही. यामुळे ही भाववाढ झाल्याचे अभ्यासक सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजारात एका महिन्यात सोयापेंडेचे भाव २० टक्क्यांनी वाढले. यामुळे भारताकडे मागणी वाढली. परिणामी सोयाबीनची भावपातळी २०० ते ३०० रुपयांनी वाढल्याचेही जाणकारांनी सांगितले.

सोयाबीनच्या भाववाढीला तसे तीन बाजारातील पायाभूत घटक कारणीभूत आहेत. पण तिन्हींच्या मुळाशी एक कारण आहे. ते म्हणजे ब्राझील. ब्राझील हा जगातील महत्त्वाचा सोयाबीन उत्पादक देश. यंदा ब्राझीलमध्ये आतापर्यंतचे विक्रमी सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवर दबाव होता. त्याचा परिणाम आपल्या सोयाबीनच्या भावावरही दिसून येत होता. त्यामुळे आपला भाव ४ हजार ५०० रुपयांचा टप्पा पार करत नव्हता. म्हणजेच भाव दबावात राहण्यामागही ब्राझील काही प्रमाणात कारणीभूत होता.

Leave a Comment