Namo benefits yojana शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच महिन्यात तीन योजनांचे पैसे जमा होणार.

Namo benefits yojana नमस्कार मित्रांनो या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन योजनांचे पैसे जमा होणार आहेत तर कोणत्या योजना चे पैसे जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिली जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महा सन्मान योजना जी की सन 2023 च्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे तसेच बळीराजा च्या उत्पन्न वाढीसाठी योजना वर्षाला सहा हजार रुपये भर घालणारी लाभदायी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि दुसरा हप्ता आता जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे.

 

तसेच मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी गारपीटग्रस्तांना तीन हेक्टर च्या मर्यादासाठी प्रति हेक्टरी १३६०० रुपये तसेच बागायतीसाठी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपयाची मदत घोषित करण्यात आली आहे. अवकाळी तसेच गारपीटग्रस्तांच्या वाढीव मदती संदर्भात सोमवारी महसूल विभागाने शासन निर्णय जीआर जारी करण्यात आला आहे तसेच एसडी आरएफ च्या निकषानुसार यापूर्वी दोन हेक्टर च्या मर्यादित मदत दिली जात होती त्यात आता वाढ करून तीन हेक्टरपर्यंत मदतीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

तसेच जिरायती शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये ऐवजी आता 13600 रुपये तर बागायती पिकासाठी हेक्टरी सतरा हजार रुपये ऐवजी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरण्यासाठी पूर्वी 22 हजार पाचशे रुपये वरून आता 36 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे तसेच ही मदत तीन हेक्टर च्या मर्यादित शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या पंचवीस टक्के अग्रीम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यातील 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपये म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि त्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर याबाबत कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा 25% अग्री पिक विमा मिळणार आहे धन्यवाद.

Leave a Comment