Namo Shetkari 2St installment नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार शुक्रवारी तारीख फिक्स!

Namo Shetkari 2St installment नमस्कार शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता मिळवण्याची तारीख आलेली आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत,शेतकरी बांधवाना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वार्षिक ६ हजार रुपये मिळतात हे तर सर्वाना माहितच आहे. आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना आणली आणि यामध्ये देखील वार्षिक ६ हजार रुपये शेतकरी बांधवाना मिळणार आहे.

पीएम किसान व नमो शेतकरी योजना असे दोन्ही मिळून शेतकरी बांधवाना १२ हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. म्हणजेच आता शेतकरी बांधवाना दर महा १००० रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार आहे. पीएम किसान योजनेचे पैसे अनेक शेतकरी बांधवाना मिळत आहेत.या योजनेमध्ये अधिक शेतकऱ्यांच्या समावेश मात्र महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता.

 

Namo Shetkari 2St installment दुसरा हप्ता विलंब होण्याचे एक कारण हि आहे कि कृषी विभागाने जी पडताळणी केली त्यामध्ये नवीन 7 लाख 41 हजार शेतकरी समाविष्ट करण्यात आलेलेल आहेत म्हणजेच केंद्र सरकारचा पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील पात्र लाभार्थ्याची संख्या 93.07 लाख एवढी झालेली आहे.म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान समान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकरी बांधवाना देखील आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे.तर तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या 26 जानेवारीला देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्त शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.

 

Namo Shetkari 2St installment या दिवशी मिळणार पैसे दिनांक 26 जानेवारी या रोजी हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. या योजना अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत त्याप्रमाणे नमो योजनासंबंधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती. तर हा हप्ता  जानेवारी महिन्यात या रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे, तर ही आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी धन्यवाद.

Leave a Comment