SSC bord exam 2024 विद्यार्थी मित्रहो या तारखेपासून मिळणार दहावीचे हॉल तिकीट.

SSC bord exam 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रहो आज आपण येणाऱ्या वार्षिक बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मिळण्या बाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उद्या, बुधवारपासून (३१ जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

शाळांनी कोणतेही शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर लेखी परीक्षा एक ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे.SSC bord exam 2024

 

या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे. प्रवेशपत्रात विषय, माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.

घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्याचे नाव, छायाचित्र, स्वाक्षरी याबाबत दुरुस्त्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे, अशी माहिती ओक यांनी दिली आहे.शिक्का करून स्वाक्षरी‘प्रवेशपत्रावरील छायाचित्र सदोष असल्यास, त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिकटवून प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळांनी पुन्हा प्रवेशपत्राची प्रत डाउनलोड करून, त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा मारून ती विद्यार्थ्यांना द्यायची आहे,’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment